कूपर रुग्णालयात पोटाच्या विकारासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू!

गेल्या काही वर्षांमध्ये पोटाच्या विविध विकारांच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यावर तात्काळ निदान आणि उपचार मिळणे आवश्यक आहे. यामुळे कूपर रुग्णालयात पोट विकासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येतोय.

मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयत ‘पोट विकार’ बाह्यरुग्ण विभाग बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे.

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा कूपर रुग्णालय पर्यवेक्षकीय समितीचे सदस्य डॉ. शैलेश मोहिते यांच्या हस्ते बुधवारी या बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन करण्यात आले. औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि पदव्युत्तर अधिष्ठाता डॉ.नीलम रेडकर यांनी हा विभाग सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला.

एन्डोस्कोपीच्या माध्यमातून या विकारांचे निदान करणे अधिक सुलभ होणार आहे. या सेवेमुळे गरजू रुग्णांना निश्चितच लाभ होणार आहे.

तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत कौशल्य संपादीत करण्याचा फायदा या बाह्यरुग्ण विभागामुळे होणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशी सेवा देणारे हे पहिले रुग्णालय ठरले आहे.

पश्चिम उपनगारत पालिकेने कुपर रुग्णालय सुरू केल्यानंतर त्याच्या विस्ताराच्या विविध योजनाही तयार करण्यात आल्या आहेत. टप्प्या टप्प्याने त्याची अंमलबजावणी सुरू आहे. 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या निर्देशानुसार व संचालक नीलम अंद्राडे यांच्या सूचनेनुसार कूपर रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नवीन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.


हेही वाचा

पालिका रुग्णालयात 83 प्रकारच्या रक्त चाचण्या कमी दरात

महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम

पुढील बातमी
इतर बातम्या