१ कोटींहून अधिक जण अजूनही लसीकरणापासून वंचित

(Representational Image)
(Representational Image)

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईसह राज्यभरात लसीकरण केलं जात आहे. लसीकरण हाच कोरोनावर जालीम उपाय असून, लसीकरणावर जोर दिला जात आहे. परंतू, जवळपास १ कोटी २६ लाख लोक अजूनही लसीकरणापासून वंचित असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, येत्या २० दिवसांत १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

कोरोना महामारीचे संकट रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.महाराष्ट्रात जवळपास ८ कोटी नागरिकांचा कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. १ कोटी २६ लाख लोक अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत.

येत्या २० दिवसांत १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. राज्यात सध्या रोज साडेसहा लाख लोकांचे लसीकरण होत आहे. या गतीनं लसीकरण झाल्यास येत्या २० दिवसांत लसीकरण पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी लस न घेतलेल्या लोकांची गावनिहाय यादी तयार करण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीला मेसेज पाठवण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या