प्लाझ्मा दान करण्यासाठी 'ते' निरुत्साहीच

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण (corona patients) वाढत आहेत. कोरोनावर कोणतंही औषध अद्याप उपलब्ध नसलं तरी, कोरोनावर प्रभावी पर्याय म्हणून प्लाझ्मा उपचार (plasma therapy) पद्धती महापालिका रुग्णालयात केल्या जात आहे. प्लाझ्मा दान केल्यानं अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव वाचण्याची शक्यता आहे. याबाबात वारंवार आवाहन करूनही मुंबईकर विशेषत: तरुण मंडळी या प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेत नसल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत प्लाझ्मा दान (plasma donation) मोहिमेला प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. सध्यस्थितीत हजारापेक्षाही कमी जणांकडून प्लाझ्मा दान झाल्याची माहिती मिळाते आहे. नागरिकांनी प्लाझ्मा दान करावं यासाठी जनजागृती केली जात आहे. परंतु, कोरोनातून मुक्त झालेले रुग्ण पुन्हा रुग्णालयाची शिडी चडण्यास घाबरत असल्याचं चित्र दिसत आहे. तसंच, लोक निरुत्साही असल्याचा अनुभव पालिका रुग्णालयांना येत आहे.

कोरोना काळाच्या मध्यावर असतानाच प्लाझ्मा दान उपचाराचा पर्याय सुचवण्यात आला होता. प्लाझ्मा थेरेपी हा कोरोनावर अद्यापही प्रभावी उपचार नाही. मात्र, ऑफ लेबल देण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना याचा फायदा होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं, प्लाझ्मा दानासाठी आवाहन केलं जात आहे. यात काही जणांनी प्लाझ्मा दान केल्याने प्लाझ्मा थेरेपीचा उपचार म्हणून प्रयोग करण्यात आला.

महापालिका (bmc) प्रमुख रुग्णालयांमधून प्लाझ्मा संकलित करण्यात येत असला तरीही दानासाठी अल्प प्रतिसाद येत आहे. दरम्यान, कोरोना मुक्त रुग्णांना फोन करून प्लाझ्मा दानासाठी इच्छूक आहेत का असे विचारले जाते. प्लाझ्मा दानासाठी समुपदेशन करुन त्यांना प्लाझ्मा दानासाठी बोलावले जात असल्याचं समजतं.

पुढील बातमी
इतर बातम्या