फार्मासिस्टचा घंटानाद

मुंबई - नॉन फार्मासिस्टला फार्मासिस्ट म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने फेटाळला आहे, असं असले तरी हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन प्रयत्नशील असल्याचा आरोप महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने केला आहे. तर कोणत्याही परिस्थितीत रूग्णांच्या जीवाशी खेळणारा हा प्रस्ताव मंजुर होऊ देणार नाही, असे म्हणत असोसिएशनने आता या प्रस्तावाविरोधात जनआंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच राज्यभरातील फार्मासिस्ट मुंबईत धडकत घंटानाद करणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी दिली आहे. दरम्यान या प्रस्तावाविरोधात देशभर फार्मासिस्ट संघटनाद्वारे आंदोलन सुरू असून या संघटनांनी हा प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या