ठरलं! पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लस घेणार

कोरोनाच्या प्रादुर्भावाला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी मुंबईसह देसभरात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला सुरूवात झाली आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, सध्या लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईनवर्कर्सना लस दिली जात आहे. तसंच, आता लवकरच कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे, व या टप्प्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कोरोना लस घेणार असल्याची समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व राज्यातील मुख्यमंत्री कोरोना लस टोचून घेणार आहेत. सर्वसामान्यांमध्ये लसीबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मोदी आणि इतर नेते लस घेणार आहेत. 'लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील लोकांना लस दिली जाईल. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी पण लस घेतील', असं लसीकरणाच्या सुरुवातीला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील सदस्या लस घेतली. तसंच, ५० वर्षांवरील सर्व खासदार आणि आमदारांना देखील कोरोना लस दिली जाणार असल्याचं समजतं. देशात सध्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. मात्र, असं असेल तरी सर्वसामान्यांमध्ये लसीबाबत एक भीतीचं वातावरण आहे. हीच भीत घालवण्यासाठी आणि लोकांमध्ये लसीबाबत आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींसह इतर नेते लस टोचणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या