Coronavirus Updates: प्रतिबंधात्मक साधनं नसल्यानं खासगी रुग्णांची वैद्यकीय सेवा बंद

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळं मुंबईसह राज्यभरातील खासगी रुग्णांची वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, यांना कोरोनाच्या विषणूपासून संरक्षण करण्यासाठीची साधनं नसल्यानं बंद ठेवल्याचं समजतं. वैद्यकीय उपचारांसाठी मास्क, ग्लोव्हज्, गाऊनसारखी प्रतिबंधात्मक साधनं नसल्यामुळं वैद्यकीय उपचार करू शकत नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहे. याबाबच डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. 

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिननं अत्यावश्यक सुरक्षेची वैद्यकीय साधनं रुग्णालयांना तातडीनं द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. अपुरी वैद्यकीय साधनं आणि संसर्गाच्या भीतीनं कर्मचारी रुग्णसेवा द्यायला तयार नसल्यानं डॉक्टरांनाही दवाखान्यांमध्ये वैद्यकीय सेवा देता येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी खासगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात यावी, अशीही विनंती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

वातावरणामध्ये बदल होत असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसादुखी तसेच साथीचे आजार पसरत आहेत. यामध्ये करोनासारख्या आजारांचा प्रादुर्भावही वाढला आहे. सार्वजनिक रुग्णालयांमधील ओपीडी सेवा बंद झाल्यानंतर खासगी रुग्णालयांनी वैद्यकीय सेवा बंद करू नये, असे आवाहनही सरकारनं केलं आहे. रुग्णांना या काळामध्ये दिलासा द्यायचा असेल, तर डॉक्टरांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवा, अशी मागणी वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या