लसीकरणानंतर मद्यपान न करण्याचा सल्ला, डॉक्टरांमध्ये संभ्रम

रशियानं अलीकडेच एक सल्ला दिला होता की, COVID 19 लस प्राप्त घेतल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत मद्यपान करणं टाळलं पाहिजे. तथापि, या सल्लागारानं भारतातील अनेक डॉक्टरांना गोंधळात टाकलं आहे.

देशाने आपत्कालीन वापरासाठी दोन लस मंजूर केल्या आहेत. एक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (कोविशिल्ट) आणि दुसरी भारत बायोटेक (कोव्हॅक्सिन) यांनी तयार केली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)चे सदस्य आणि राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे म्हणाले की, दोन लसींसाठी सध्या उपलब्ध असलेल्या छापील मजकुरात अल्कोहोलचा उल्लेख नाही.

डॉ. साळुंखे म्हणाले, “मी अल्कोहोलचे सेवन आणि कोविड १९ लस यासंदर्भात अभ्यास केला. मला आढळलं की यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. जसे तुम्ही मद्यपान करून वाहन चालवू नये, त्याचप्रमाणे तुम्ही लसी घ्याल त्यादिवशी पिऊ नये.”

हे लक्षात घेण्यासारखे आहे की अल्कोहोलचे सेवन कोणत्याही प्रकारे लसीची कार्यक्षमता कमी करते असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

“४५ दिवसांच्या कालावधीविषयी कोणालाही खात्री नाही. परंतु लसीकरण होण्यापूर्वी आणि नंतर काही दिवस मद्यपान न करणं यातच शहाणपण आहे,” असं एंडोक्रायोलॉजिस्ट आणि राज्यातील कोविड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं.

लसीसंदर्भात अल्कोहोलविषयी चर्चा काही आठवड्यांपूर्वी सुरू झाली. एक रशियन मंत्री म्हणाले की, लसीकरणानंतर ४५ दिवसांपर्यंत मद्यपान करणं टाळलं जावं. दिलेला तर्क म्हणजे लसद्वारे covid 19 च्या अन्टीबॉडीज तयार करण्याच्या प्रक्रियेत शरीराची प्रतिकारशक्तीशी तडजोड केली जात नाही हे सुनिश्चित करणं.


पुढील बातमी
इतर बातम्या