रोगांबाबत जनजागृतीसाठी हरप्रयत्न

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

माटुंगा - डेंग्यू आणि मलेरियाला आळा घलण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत महापालिका कोणतीच कसूर सोडत नाहीये. त्याचाच एक भाग म्हणजे माटुंग्यातील भाऊ दाजी मार्गाजवळ एफ उत्तर कार्यलयात साकारण्यात आलेली एक प्रतिकृती. या प्रतिकृतीद्वारे डेंग्यू आणि मलेरिया होण्याची कारणं आणि हे आजार टाळण्याचे उपायही अधोरेखित केलेले आहेत. 3 वर्षांपासून महापालिका जून महिन्यात अशी प्रतिकृती उभारते. पण यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येही डेंग्यू आणि मलेरियानं डोकं वर काढल्यानं महापालिकेनं पुन्हा ही प्रतिकृती खुली केलीये.

पुढील बातमी
इतर बातम्या