रशिया देणार भारताला कोरोना वॅक्सीनचे १०० दशलक्ष डोस

भारतात वेगानं वाढणार्‍या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर एक प्रभावी लस आणण्यावर सर्वच देश लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. जगातील पहिली कोरोना विषाणूची लस 'स्पुतनिक व्ही' असल्याचा दावा करणार्‍या रशियानं भारताला १०० दशलक्ष डोसची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

रशियानं गेल्या महिन्यात कोरोनावरील लस लाँच केल्याची घोषणा केली. रशियानं या लसीचं नाव 'स्पुतनिक व्ही' असं ठेवलं आहे. ११ ऑगस्टला राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपली पहिली लस जाहीर केली. सोव्हिएत युनियननं सुरू केलेल्या जगातील पहिल्या उपग्रहाच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलं आहे.

प्रथम ही लस आरोग्य कर्मचार्‍यांसह अधिक जोखीम असलेल्या लोकांना दिली जाईल. हे आरडीआयएफच्या संयुक्त विद्यमान गमालय रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनं तयार केलं आहे.

TOIच्या म्हणण्यानुसार, लसीची क्लिनिकल चाचणी आणि विक्रीसाठी रशियानं डॉ. रेड्डीज इंडियाच्या प्रयोगशाळेशी करार केला आहे. या प्रकरणात, भारतातील लस नियामकाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर, १०० दशलक्ष डोस लॅबला पाठवले जातील. ते म्हणाले की, करार झाला आहे, परंतु क्लिनिकल चाचणी आणि लस वितरण हे दोन्ही भारताच्या नियामक मंजुरीवर अवलंबून आहेत.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) किरील दिमित्रीव यांनी निवेदनात म्हटलं आहे की, चाचणी यशस्वी झाल्यास नोव्हेंबरपर्यंत ही लस भारतात उपलब्ध होईल. ते म्हणाले की, डॉ. रेड्डी यांचा जवळपास २५ वर्षांपासून रशियामध्ये व्यवसाय आहे आणि ती एक मोठी भारतीय कंपनी आहे.

ह्यूमन इडेनोव्हायरस ड्युअल वेक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित रशियन लस भारतातील कोरोनाविरूद्ध सुरक्षित लढायला मदत करेल असा दावा त्यांनी केला.

दिमित्रोव्ह म्हणाले की कझाकस्तान, ब्राझील आणि मेक्सिकोसह सुमारे २० देशांकडून 'स्पुतनिक व्ही' लसीच्या अब्ज डोसचे आदेश प्राप्त झाले आहेत. रशिया आणि चार देशांतील भागीदारांसह दरवर्षी त्यातील ५०० दशलक्ष डोस तयार केले जातात.

ते म्हणाले की, लॅटिन अमेरिकन, पश्चिम आणि दक्षिण आशियाई देशांनी ही लस खरेदी करण्यात रस दर्शवली आहे. अशा परिस्थितीत लसची मागणी वाढत आहे.

रशियानं ही लस तयार करण्यासाठी भारताशी भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर, ही लस तयार करणाऱ्या गमालय रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमोलॉजी अण्ड मायक्रोबायोलॉजी कडून भारतानं या लसीचा संपूर्ण डेटा विचारला होता. भारतातील अधिकारी आणि तज्ञ त्याचे विश्लेषण करण्यात व्यस्त आहेत. आता याची भारतात तिसर्‍या टप्प्यातील चाचणी होणार आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या