'स्वाईन फ्लू' होऊ नये म्हणून सामाजिक संस्थेचा पुढाकार

वाढत्या तापमानामुळे अनेक आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच सध्याची जीवनशैली, खानपान व्यवस्था आणि वातावरणातील बदलामुळे नागरिकांमधली रोग प्रतिकार शक्ती देखील कमी होत असल्याने कोणत्याही रोगाची लागण सहज होते. त्यातच सध्या राज्यात 'स्वाईन फ्लू' ने थैमान घातले असून, या रोगाची लागण मुंबईकरांना होऊ नये याकरिता त्वरित उपाययोजना राबविण्यात याव्यात या मागणीसाठी तनिष्का सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना एक लेखी निवेदन मंगळवारी देण्यात आले. 

आजही मुंबईतील लाखो प्रवासी एसटीने लांबचा प्रवास करतात. प्रवासा दरम्यान अशा संसर्गजन्य रोगाची लागण मुंबईकरांना होऊ शकते. यावर निर्बंध आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने तातडीने उपाययोजन राबविण्यात याव्यात या मागणीसाठी संस्थेच्या शिष्टमंडळाने मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल आणि महाव्यवस्थापक (वाहतूक) आर.आर.पाटील यांची भेट घेऊन एक लेखी निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर लगेच पुणे, स्वारगेट, बोरिवली, मुंबई आदी ठिकाणी औषध फवारणी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पांचाळ यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या