रशियातील स्पुटनिक व्ही लस मुंबईत दाखल

रशियात तयार झालेली स्पुटनिक व्ही ही लस आता मुंबईतही दाखल झाली आहे.  या लसीसाठी आरोग्य सेतूवर नोंदणी करणं आवश्यक आहे. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही लस उपलब्ध आहे.

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरीही धोका टळलेला नाही. तिसरी लाट येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भारतात वेगाने लसीकरण होणं गरजेचं आहे. भारतात रशियाची स्पुटनिक व्ही कोरोना लसीचं उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करीत असून या एका लसीची किंमत १ हजार १४५ आहे. १८ वर्षांवरील व्यक्ती ही लस घेऊ शकतात तसेच २१ दिवसांनी या लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

रशियातील शास्त्रज्ञांनी ‘द लान्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात लसीच्या संशोधनाबाबतचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील दाव्यानुसार, रशियात लसीच्या ज्या सुरुवातीच्या चाचण्या झाल्या, त्यात लसीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे संकेत मिळाले आहेत. चाचणीत सहभागी झालेल्या ज्या ज्या लोकांवर लसीची चाचणी घेण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. विशेष म्हणजे, या चाचणीमुळे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्ससुद्धा झाले नाहीत, असाही दावा रशियन शास्त्रज्ञांनी ‘द लान्सेट’मधील अहवालात केला आहे.

दोन अब्ज डोस हे पुढील पाच महिन्यांमध्ये भारताला उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी  रशियाने या लसीची नोंदणी केली होती म्हणजेच कोरोना विरोधातील जगभरातली ही पहिली लस आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या