मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईत यंदा मुसळधार पावसाची सुरूवात जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून झाली. जुलै महिन्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढला. पावसाचा जोर वाढता असताना मुंबईमध्ये लेप्टो, कॉलरा, मलेरिया, डेंग्यू या आजारांचा प्रसार वाढला असून, लेप्टो आणि डेंग्यूने जुलै महिन्यात प्रत्येकी एक बळी घेतला आहे. त्यामुळं मुंबईकरांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.

११३ स्वाइन फ्लूचे रुग्ण

जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं या महिन्यात एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण मुंबईत आढळला नाही. मात्र, जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळं पहिल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत महिन्याच्या शेवटी रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली. जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये ३६ रुग्णांना बाधा झाली. तसंच, जुलैच्या शेवटच्या १५ दिवसांत ७७ रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा झाली एकूण ११३ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट झालं आहे.

विविध रुग्णालयामध्ये उपचार

मागील वर्षी जुलैपर्यंत स्वाइन फ्लूच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नव्हती. मात्र, यंदा स्वाइन फ्लूच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तसंच, स्वाइन फ्लूमुळं २ मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, हे रुग्ण मुंब्रा आणि डोंबिवली येथील रहिवाशी असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्याशिवाय, लेप्टो आणि डेंग्यूमुळं ही प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एका ३२ वर्षीय पुरुषाला डेंग्यूची लागण झाली होती, तर ४५ वर्षीय महिलेला लेप्टोची लागण झाली होती. तुंबलेल्या पाण्यामुळे ५५ वर्षीय महिलेचा लेप्टोस्पायरोसिसनं मृत्यू झाला आहे.

रुग्णांची संख्या

आजार  

जून (रुग्ण)

जुलै (रुग्ण) 

स्वाइन फ्लू  

११३

लेप्टो

 ५  

६२

डेंग्यू 

२१

मलेरिया 

३१०

३५१

गॅस्ट्रो

 ७७७

८९४

पुढील बातमी
इतर बातम्या