कर्करुग्ण, निवासी डॉक्टरांना हाफकिन देणार आसरा

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

परळ (पू) - टाटा कर्करोग रुग्णालयातील रुग्ण आणि निवासी डॉक्टरांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी हाफकिन इन्स्टिट्युटच्या आवारात इमारती उभारल्या जाणार आहेत. रुग्णालयानं या आराखड्याला मान्यता दिली आहे.

टाटा रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेण्यासाठी कानाकोपऱ्यातून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात. जागा अपुरी पडत असल्यानं अनेक रुग्ण उपचारांदरम्यान त्यांच्या नातेवाईकांसोबत रस्त्यावरच राहतात. त्याचप्रमाणे निवासी डॉक्टरांनाही मुंबईत ठिकठिकाणी वसतिगृहांतून राहावं लागतं. त्यामुळे रुग्ण आणि निवासी डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यावर तोडगा म्हणून परळच्या हाफकिन इन्स्टिट्युटच्या आवारात सहा लाख चौरस फुटांची इमारत बांधली जाणार आहे. त्यात दीड लाख चौरस फुटांचं वसतीगृह शिकाऊ डॉक्टरांसाठी असेल. उरलेल्या भागात टाटा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांसाठी धर्मशाळा बांधण्यात येणार असल्याचं रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या