'या' खाजगी कंपनीनं बनवली ५०० रुपयाची टेस्टिंग किट

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगनामध्ये जीसीसी बायोटेक इंडिया या खासगी कंपनीनं दावा केला आहे की, त्यांनी रिअल-टाईम COVID 19 चाचणी किट तयार केली आहे. प्रति किटची किंमत फक्त ५०० रुपये असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. हे किट कोरोनाव्हायरसचे अधिक रुग्ण असलेल्या राज्यांसाठी फायदेशीर ठरेल.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाव्हायरसमुळे अलीकडे आणखी ११ रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात मृतांचा आकडा ९९ च्या घरात गेला आहे. राज्यात आणखीन १०८ जणांची कोरोनाव्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गृहसचिव अलापन बंड्योपाध्याय यांच्यानुसार, पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार ७८६ वर गेली आहे. गेल्या सात दिवसांत राज्यात आतापर्यंत ५२७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३८ मृत्यूची नोंद झाली आहे.

गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या २३ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यात COVID 19 चे नवे रुग्ण आढळले आहेत. कोलकातामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे. मुख्य म्हणजे शहरातील लोकसंख्येतून अनेक लोक सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोलकातामध्ये एकूण ९११ लोकांची चाचणी पॉझिटिव्ग आली आहे. त्यापैकी ११६ जणांचा मृत्यू झाला आहे.

COVID 19 व्यवस्थापनावर राज्य सरकार पुरेश्या चाचण्या घेत नसल्याचं सांगत केंद्रानं नुकतीच राज्य सरकारवर टीका केली होती. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पश्चिम बंगालमध्ये चाचण्यांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि देशात सर्वाधिक मृत्यु दर १३.२ टक्के आहे. राज्य सरकारनं आपल्या बचावामध्ये असं म्हटलं आहे की, पायाभूत सुविधा नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामुळे राज्यात मृत्यूचे प्रमाण अधिक वाढले.


पुढील बातमी
इतर बातम्या