मॉडेल प्रिस्क्रिप्शनची ऐशीतैशी

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

मुंबई - डॉक्टर्सनी सुवाच्च अक्षरात कॅपिटल लेटरमध्ये प्रिस्किप्शन लिहावं..त्यावर रुग्णांसह डॉक्टरची संपूर्ण माहिती असायला हवी, आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर्सनी रुग्णांच्या खिशाला परवडणारी जेनेरिक औषधांची नावं लिहीलेही हवीत. मात्र सध्या डॉक्टर्सकडून या गाईडलाईन्स पाळल्या जात नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येतंय की काय असा प्रश्न निर्माण झालाय.

राज्य सरकारनं प्रिस्क्रिप्शन कायद्याची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी FDA किंवा IMC वर टाकली तर डॉक्टर्सवर वचक बसेल असं मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं व्यक्त केलंय. तर रुग्णांपेक्षा डॉक्टरांमध्येच जनजागृतीची गरज असल्याचं काही डॉक्टरांनी म्हटलंय.

एफडीएन दोन वर्षांपूर्वी या गाईडलाईन्स करूनही राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करतय. त्यामुळे राज्यसरकार याबाबत कधी कठोर होणार हे पाहावं लागेल.

पुढील बातमी
इतर बातम्या