४ फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे

मुंबई - ४ फेब्रुवारी हा वर्ल्ड कॅन्सर डे मानला जातो. लोकांना कॅन्सर बद्दल माहिती मिळावी आणि या रोगापासून कसा बचाव करता येईल याविषयी जनजागृती केली जावी यासाठी या दिवशी उपक्रम राबविला जातो.

कॅन्सर हा शरीरातील अनियंत्रित वाढणाऱ्या पेशींमुळे होणारा रोग आहे. कॅन्सर हा रोग कुठल्याही पेशीमध्ये, कुठल्याही उतीमध्ये किंवा कुठल्याही अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समानता म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. या अतिरिक्त पेशींची गाठ तयार होते. एका वर्षाला देशात सरासरी 8 लाख लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. 2016 मध्ये 14.5 लाख केसेस समोर आल्या आहेत. तर 2020 मध्ये हा आकडा 17.3 लाखपर्यंत जाऊ शकतो, असे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे.

केमोथेरपी, रेडीओथेरपी आणि शस्त्रक्रियेद्वारे कॅन्सरला आळा बसू शकतो. त्यातल्या त्यात जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो हे युवराज सिंग, मनिषा कोईराला आणि यांच्यासारख्या लोकांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे कॅन्सर सारख्या रोगाने खचून जाऊ नका आणि या आजरापासून दूर राहा हा संदेश देण्याकरिता जगभर ‘जागतिक कॅन्सर दिवस’ साजरा केला जातो.

पुढील बातमी
इतर बातम्या