16 ऑक्टोबर - जागतिक स्पाइन दिवस, 16 ते 34 वयोगटात स्पाईनचा त्रास वाढला!

  • भाग्यश्री भुवड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या. आपण कामाचा एवढा ताण घेतो की आपोआपच शरीराला अनेक आजार जडतात. त्यातील सर्वात घातक आणि कायमस्वरुपी राहणारा आजार म्हणजे स्पाइन...

भारतात 16 ते 34 वयोगटातील 20% लोक हे पाठीच्या आणि मानेच्या दुखण्याने त्रस्त आहेत. तर, मुंबईतील 18% तरुण हे फक्त पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहेत. शिवाय, यावर त्वरीत उपचार घेणाऱ्यांची संख्याही कमी आहे. जर एखाद्याला स्पाइनचा त्रास झाला तर तो व्यक्ती दुर्लक्ष करुन 7 आठवड्यांपेक्षा जास्त दुखणं अंगावरुन काढतो. आणि अश्यांचं प्रमाण 40 टक्के लोक आहे.

क्यूआय क्लिनिकच्या अहवालानुसार,

क्यूआय स्पाइन क्लिनिकने 2016-2017 या चालू वर्षात 20,000 रुग्णांवर सर्वेक्षण केलं. या अहवालात भारतातील नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि पुणे या शहरात सर्वात जास्त पाठीची समस्या असण्याचं निदर्शनास आलं. मुंबईत, 16 ते 34 वयोगटातील 18% लोकसंख्येला पाठीच्या आणि मनक्याचा त्रास आढळला. दिल्लीतील 25 टक्के युवापिढी पाठदुखीच्या समस्येचा सामना करत आहे. शिवाय, पाठ आणि मणक्याच्या समस्यांमुळे सर्वात जास्त त्रस्त असणारे हे 35-54 या वयोगटातील आहे.

7 आठवड्यांपेक्षा जास्त करतात समस्येवर दुर्लक्ष

अहवालानुसार, या चार शहरांतील 45 टक्के लोक त्यांच्या वेदनेकडे 7 आठवड्यांपेक्षा जास्त काळ दुर्लक्ष करतात. ज्यामुळे उपचारासाठी विलंब होतो आणि शस्त्रक्रियेचा धोका वाढतो.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मान आणि पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा ते दुखणं बरं करण्यासाठी तात्पुरते उपाय केले जातात. दुर्लक्ष करणाऱ्यांचं प्रमाण 40% एवढं आहे. पण, वारंवार या दुखण्याबाबत केली तर हा टक्का कमी होऊ शकतो. स्पाईनवर लवकरच उपचार केले गेले तर वेदना कमी होऊ शकतात. 

डॉ. गरिमा आनंदानी, क्लिनिकल डायरेक्टर

23% लोक दुखणं जाणवलं की तत्काळ उपचारांसाठी धाव घेतात. 73% घरगुती उपचार, शस्त्रक्रिया आणि फिजीओथेथेरपीचा आधार घेतात. तसंच, शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आलेल्या लोकांपैकी 62% लोक इतर पर्यायी उपचारांचा शोध वापर करतात.

यावर्षी वर्ल्ड स्पाइन डे च्या निमित्ताने स्पाइन सारख्या दुखण्यावर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामूळे पाठ आणि मणक्यांच्या स्थितीबद्दल आणि त्यांच्या उपचारांविषयी जागरूकतेची गरज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. 

डॉ. अनज एरिनाजा, एमडी आणि सीईओ, क्यूई स्पाइन क्लिनिक

शिवाय, सर्वात जास्त रुग्ण पाठदुखीच्या दुखण्याने त्रस्त आहेत. 73% लोकांना पाठदुखीची समस्या आहे.13.5% लोक मणका आणि पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहेत.

महिलांपेक्षा पुरुष करतात दुर्लक्ष 

या दुखण्यावर पुरुषांच्या तुलनेत महिला फक्त 8 टक्के उपचार करतात. पण, पुरुष आपल्या दुखण्याकडे महिलांपेक्षा जास्त दुर्लक्ष करत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. म्हणजे 46 टक्के महिलांचा उपचार करण्याकडे कल असतो. तर, त्याच्या तुलनेत 54 टक्के पुरुष उपचार करतात.

पाठदुखी, कंबरदुखी, मणकेदुखी यांनतर स्लिप डिस्कचा प्रकारही मोठ्या प्रमाणात आढळला आहे. एकूण लोकसंख्येपैकी 35 टक्के लोक सौम्य प्रकारच्या स्लिप डिस्कने त्रस्त आहेत. पण, जर स्पाइन सारख्या दुखण्याकडे जर दुर्लक्ष केलं तर हा आजार कायमस्वरुपी पाठ सोडत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य उपचार हा एकच उपाय स्पाइनपासून बचाव करु शकतो.


पुढील बातमी
इतर बातम्या