बीकेसीत सुपरमार्केटला प्रतिसाद मिळणार?

मुंबई - एमएमआरडीए लवकरच बीकेसीत सुपरमार्केट सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार एशियन हार्ट रुग्णालयाजवळ सुपरमार्केट सुरू करण्यासाठी एमएमआरडीएनं नव्यानं निविदा काढल्या आहेत. एमएमआरडीएतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहती दिली. यापूर्वी एमएमआरडीएनं सुपरमार्केटसाठी तीन वेळा निविदा काढल्या होत्या, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एमएमआरडीएनं निविदा काढली आहे. बीकेसी परिसरात खासगी, सरकारी कंपन्या आणि निवासी इमारती उभ्या राहू लागल्यात. मात्र बीकेसीत जनरल स्टोअर्स किंवा शाँपिंग सेंटर नाहीये. त्यामुळे गृहोपयोगी वस्तूंसाठी इथं कुठलीच सोय नाही. त्यामुळे इथले रहिवासी आणि नोकरी-व्यवसायानिमित्तानं येणाऱ्यांची चांगलीच अडचण होते. त्यामुळेच हे सुपरमार्केट उभारण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या