करी रोड स्थानकात उभारणार पादचारी पूल

  • प्रसाद कामटेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

करी रोड - करी रो़ड रेल्वे स्थानक ते लोअर परळपर्यंत पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार आहे.

एमआरव्हीसी तसेच महापालिकेच्या साहाय्याने करी रोड स्थानकापासून लोअर परळपर्यँत हा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे परळ स्थानकावर मध्य रेल्वेकडून पादचारी पूल बांधण्यात येणार आहे.

" रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे १००कोटी रुपये खर्चून ३६ पादचारी पूल २ वर्षात बांधणार आहे. यापैकी १७ पूल हे मध्य रेल्वेकडून, १० पूल एमआरव्हीसी आणि नऊ पूल हे विविध पालिकांकडून उभारण्यात येणार आहेत",अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या