मध्य रेल्वे CSMT, दादर, ठाणे, कल्याणसह इतर ३ स्थानकांवर उभारणार स्तनपान पॉड्स

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, ठाणे आणि कल्याणसह मुंबई विभागातील सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर 13 अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स उभारण्याची योजना आखली आहे. प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मध्य रेल्वेने सुरक्षित आणि आरामदायी असे हे स्तनपान पॉड तयार करण्याची योजना आखली आहे. 

हे नर्सिंग पॉड भारतीय रेल्वेच्या नॉन-फेअर महसूल धोरणांतर्गत स्थापन केले जातील आणि प्रवाशांसाठी त्यांच्या सेवा मोफत उपलब्ध असतील. या योजनेंतर्गत सीएसएमटी येथे एक नर्सिंग पॉड, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी तीन, ठाणे आणि लोणावळा येथे प्रत्येकी दोन आणि कल्याण आणि पनवेल येथे प्रत्येकी एक नर्सिंग पॉड उभारण्यात येईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रत्येक पॉडमध्ये आरामदायी, उशी असलेली बसण्याची जागा, डायपर बदलण्यासाठी स्टेशन, एक पंखा, एक लाईट आणि वापरलेल्या डायपरची विल्हेवाट लावण्यासाठी डस्टबिन यांचा समावेश असेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पॉडची देखभाल आणि सुरक्षा ही परवानाधारकाची जबाबदारी असेल.

नर्सिंग पॉडमधील सामग्री वापरानुसार पुन्हा भरली जाईल. पंखे आणि दिवे यांसारख्या विद्युत उपकरणांमधील दोष त्वरीत दूर केले जातील, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

सरासरी 35 लाख लोक दररोज मध्य रेल्वेची सेवा वापरतात आणि त्यापैकी सुमारे 20 टक्के महिला आहेत.

"बाळांसह उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे हे निःसंशयपणे एक प्रचंड कठीण काम आहे.  स्तनपान करणार्‍या मातांसाठी सोयीसुविधांचा अभावामुळे प्रवास करणे अधिक कठिण होते," सुजाता शहा या वारंवार प्रवास करणाऱ्या महिला म्हणाल्या. त्यामुळे, नर्सिंग पॉड्स अनेक नर्सिंग मातांसाठी एक मोठा दिलासा असेल, त्या म्हणाल्या.

“बर्‍याच स्त्रिया आपल्या बाळाची काळजी घेत असतानाही काम करू लागतात. अशाप्रकारे, ही योजना त्या महिलांना त्यांच्या बाळांना फक्त दूध पाजण्यासाठीच नव्हे तर डायपर बदलण्यासाठीही मोठी मदत होईल,” असे ठाण्यातून वारंवार प्रवास करणाऱ्या सुश्री मृदुला झा यांनी सांगितले.


पुढील बातमी
इतर बातम्या