सायन - पिलरला तडे, घरातल्या भिंतींना तडे, पाण्याची टाकी आणि ड्रेनेज लाईनला गळती. ही दुरवस्था आहे प्रतिक्षानगरमधील म्हाडाच्या चैतन्य इमारतीची.
या इमारतीच्या समस्यांविषयी मुंबई लाइव्हनं म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांच्याशी संपर्क साधला. "माझ्यापर्यंतही चैतन्य सोसायटीचा विषय आला आहे. यासंबंधी लवकरच कार्यवाही करून हा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन झेंडे यांनी दिले. म्हाडाच्या इमारतींचं बांधकाम करणाऱ्या बी. जी. शिर्के कंपनीच्या बांधकामाच्या दर्जावर अनेक वर्षांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे म्हाडाची घरं स्वस्त असली तरी बांधकामाच्या दर्जावरून म्हाडाला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.