'या' ८ हार्बर लाइन रेल्वे स्थानकांना मिळणार इंटरकनेक्टिंग आणि स्कायवॉक ब्रिज

हार्बर मार्गावरील एकूण आठ रेल्वे स्थानकांमध्ये नवीन इंटरकनेक्टिंग पूल आणि स्कायवॉक बनवण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे (सीआर) अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या संदर्भातील त्यांचे सर्वात मोठे आव्हान डॉकयार्ड रोड आणि सेवरी स्थानकांवर फूट ओव्हर ब्रिज (FOB) बनवणं असेल. सीआर सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, क्रेरी रोड, कॉटन ग्रीन, रे रोड आणि परेल स्थानकांवरही सुधारणा करण्यात येईल.

डॉकयार्ड रोड स्थानकावरील एका टेकडी शेजारी हे ठिकाण असल्यामुळे अधिकाऱ्यांना जागेचा त्रास सहन करावा लागत आहे. सीआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, एफओबी स्थानकाच्या सीएसएमटी टोकापासून सुरू होईल. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) स्टेशनच्या प्लॅटफॉर्म १ च्या शेजारील रस्ता निश्चित करताना टेकडीवरील काम संपवावं लागेल.

इतर ठिकाणांप्रमाणेच हॅनकॉक ब्रिज सँडहर्स्ट रोड स्थानकाशी जोडला जाईल. तर क्यूरी रोड स्टेशनच्या दक्षिणेकडील भागातील एफओबी पूर्वेस वाढवला जाईल. पुढे, कॉटन ग्रीन स्टेशनवर पालिका कथितपणे स्कायवॉक तयार करेल जे सध्याच्या पायाभूत सुविधांना प्लॅटफॉर्मशी जोडेल. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रे रोड स्टेशनवर नवीन स्कायवॉक बांधला जाईल जो स्टेशनच्या एफओबीच्या उत्तरेकडे टोकाला जोडेल.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ते स्थानकांवर जास्तीत जास्त जागा निर्माण करण्याच्या विचारात आहेत आणि प्रवाशांना अनेक प्रवेशद्वार उपलब्ध करून देतील.


पुढील बातमी
इतर बातम्या