आमदार बसवणार इंग्लिश टॉयलेट

  • प्रसाद कामटेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

लोअर परेल - जेष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत आ. सुनील शिंदे यांनी आपल्या निधीतून इंग्लिश टॉयलेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. लोअर परेलमधील मानाजी राजूजू चाळीमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्य़ात येणार आहे. सहा चाऴीमधील प्रत्येक मजल्यावर एक इंग्लिश टॉयलेय(कमोड) बसवण्यात येणार आहे. यासोबतच मानाजी राजूजी चाळ आणि बाबाजी जामसंडेकर येथे नवीन स्ट्रॉम वॉटर ड्रेनिजची लाईनही बसवण्यात येणार आहे. या परिसरात पिण्याच्या पाण्याची गळती आणि गटार तुंबणे असे प्रकार होत असल्याने हे नूतनीकरण करण्यात येत आहे. आज यासंदर्भात आ. सुनील शिंदे यांनी महानगरपालिका आणि म्हाडा अधिकाऱ्यांसह भेट घेऊन पाहणी केली.  

पुढील बातमी
इतर बातम्या