एस्कीलेटर लवकरच भांडुपकरांच्या सेवेत

भांडुप स्टेशन- भांडुप स्थानकात बांधण्यात येत असलेल्या एस्कीलेटरची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. या एस्कीलेटरचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भांडुप स्थानक आणि स्कायवाॅक यांना लागून हा नवा एस्कीलेटर बांधण्यात येत आहे. त्यामुळे भांडुप पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवाशांचा फायदा होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम सुरू होते. आता या एस्कीलेटरसाठी वीज जोडणी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करणं बाकी आहे. या एस्कीलेटरचा सर्वाधिक फायदा वयोवृद्ध प्रवाशांना होणार असल्याचं भांडुप-कांजुरमार्ग रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या