गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प खर्चात १५०० कोटींची वाढ

नव्या अहवालानुसार, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या (जीएमएलआर) किंमतीचा आकडा १ हजार ५०० कोटींनी वाढला आहे. पण या प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झाले नाही हे वाचल्यावर तुमच्या भुवया उंचावल्या असतील.

GMLR प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं राबवला आहे. एप्रिलमध्ये ४ हजार ७७० कोटींच्या अंदाजाचा उल्लेख केला होता. जेव्हा प्रशासनानं रस्त्यांसह दुहेरी बोगद्याचे डिझाइन आणि बांधकाम करण्यासाठी निविदा पाठवल्या तेव्हाचा हा खर्च आहे. परंतु अगदी अलीकडील अंदाजानुसार ही किंमत ६ हजार २२५ कोटींवर पोहचली आहे.

प्रशासन असा दावा करत आहे की, ३ हजार २०५ कोटी दक्षिणेकडिल बोगद्यासाठी ठेवण्यात येतील. तर उत्तर बोगद्याची किंमत ३ हजार ०२० कोटी असेल. बोगदे ७.७ किमी लांबीचे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात किंवा एसजीएनपीमार्गे सुमारे २५ ते २०० मीटर खाली जातील.

चीनचा आता पर्याय नसल्यामुळे प्रशासकिय संस्था असं म्हणते की, ऑस्ट्रिया, जर्मनी, रशिया आणि तुर्की यासारख्या पाश्चात्य देशांमधून टनेल बोरिंग मशीनचे (टीबीएम) स्त्रोत तयार करावे लागतील. यामुळे चिनी पर्यायांच्या तुलनेत बरीच किंमत मोजावी लागेल. त्यामुळे हा खर्च वाढला आहे. चीन हे जगातील सर्वात मोठ्या टीबीएम उत्पादकांपैकी एक आहे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.

पालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, “पूर्वीच्या किंमतीची गणना ही एका वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. आता एजन्सी नेमण्याची आणि काम सुरू करण्याच्या प्रक्रियेस अजून सहा ते आठ महिने लागतील. त्यावेळी दर आणि महागाईचे दर काय आहेत ते आम्हाला पाहावं लागेल. हा भविष्यकालीन अंदाज आहे. आता आणखी एक घटक म्हणजे, नवीन अटींसह, चिनी कंपन्या कमी किमतीत टीबीएम प्रदान करणाऱ्या प्रकल्पात पात्र होऊ शकत नाहीत.”


हेही वाचा

वरळी : कचरा समुद्रात मिसळू नये म्हणून पालिका बसवतेय रेक स्क्रिन्स

५७% हॉटेल्स, मॉल्सकडून अग्निशमन विभागाच्या नियमांचं उल्लंघन

पुढील बातमी
इतर बातम्या