स्वप्न झाले साकार !

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

वांद्रे - मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना हक्काचं घर मिळालं. कोण म्हणतं देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय, असं म्हणत गिरणी कामगारांनी यल्गार पुकारला आणि अखेर गिरणी कामगारांच्या लढ्याला यश आलं. वांद्रेतल्या रंगशारदा सभागृहात शुक्रवारी गिरणी कामगारांच्या घराची सोडत निघाली. 1 लाख 35 हजार गिरणी कामगारांमधून 2 हजार 417 गिरणी कामगारांना पनवेलमध्ये हक्काची घरं मिळाली.

एकीकडे आनंदाचं वातावरण होतं तर दुसरीकडे घर न लागणाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. पण गिरणी कामगारांना मुंबईबाहेर फेकण्याचा घाट राज्य सरकारनं आखलाय, असा आरोप करत गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघानं केला. या वेळी रंगशारदाबाहेर निदर्शनं करत कामगारांना पनवेलमध्ये नाही तर मुंबईतच घरे देण्याची मागणी केली.

या सोडतीत आकर्षण ठरले ते स्वीडनवरून आलेले परदेशी पाहुणे. हे चारही परदेशी पाहुणे स्वीडनमध्ये पर्यावरण आणि कामगारांच्या प्रश्नांवर काम करतात. त्यामुळे मुंबईतील कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आलेल्या या पाहुण्यांनी गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांची भेट घेत चर्चाही केली. ऐकूणच रंगशारदामध्ये कही खुषी कही गम असं वातावरण होतं. 

पुढील बातमी
इतर बातम्या