पावसाळ्यात 'सिडको'ची 65 हजारांपेक्षा जास्त सदनिकांची लॉटरी

अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) आणि मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटासाठी सिडको महामंडळाने (CIDCO Corporation) तयार केलेल्या घरांची लवकरच लॉटरी निघणार आहे.

पहिल्या टप्प्यात तळोजा परिसरात शिर्के कंपनीतर्फे तयार करण्यात आलेली सुमारे पाच हजार घरांची लॉटरी जूनमध्ये काढण्याचा सिडकोचा विचार आहे. त्या पाठोपाठ खारकोपर, कळंबोली, खारघर, जुईनगर आणि सानपाड्यातील घरांची कामे पूर्णत्वास आल्यास त्याचीही लॉटरी निघेल.

येत्या जून महिन्यानंतर वेगवेगळ्या गटांतील गृह प्रकल्पांची लॉटरी सिडकोतर्फे काढण्यात येणार आहे.त्याअंतर्गत तब्बल ६५ हजार घरे उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. लॉटरीसाठी सिडकोने नव्या सॉफ्टवेअरचे काम पूर्ण केले आहे. जून महिन्यातील लॉटरीकरिता त्याचा वापर करण्याचा विचार सिडको वर्तुळात केला जात आहे.

भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोतर्फे वर्षभरात एक लाख घरे निर्माण करण्याची घोषणा केली होती.

सिडकोतर्फे तळोजा, उलवे, खारकोपर, कळंबोली, सानपाडा, जुईनगर आदी परिसरात गृह प्रकल्प उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. विशेष म्हणजे, सिडकोने पहिल्यांदाच घरांच्या निर्मितीची कामे रियल इस्टेट जगतातील नावाजलेल्या एल अॅण्ड टी शापूरजी पालनजी इत्यादींसारख्या नामांकित कंपन्यांना दिली आहेत.


हेही वाचा

म्हाडा लॉटरी मुंबई 2023: 4 हजार 83 घरांची बंपर लॉटरी, पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

पुढील बातमी
इतर बातम्या