बी विभागात मार्गांवर लागणार नवे बोर्ड

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

मस्जिद बंदर - येथील बी विभागातल्या रस्त्यांवर लवकरच नवे नामफलक झळकू लागतील, अशी माहिती कनिष्ठ अभियंता भारत इंगळे यांनी दिली. नरशी नाथा स्ट्रीट, जंजीकर स्ट्रीट, सॅम्यअल स्ट्रीट, दाणाबंदर रोड आदी रस्त्यांवर हे नवे नामफलक लागतील. हे बोर्ड लावण्याची निविदा आयुक्तांनी मंजूर केली असून महिनाभरात जुन्या बोर्डच्या जागी नवे बोर्ड लावण्यात येतील. त्याचप्रमाणे दोन जागांवर नामफलकच नाहीयेत, तिथेही ते लावण्यात येतील. एकूण 15 ठिकाणी हे नामफलक लागतील.

पुढील बातमी
इतर बातम्या