‘आरेतील 'मेट्रो-3'ची कामे नियमानुसारच’

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीतल्या कारडेपोचं काम नियमानुसारच होतंय, असा खुलासा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून आरेतील मेट्रो-3 चं काम नियमबाह्य होत असल्याचा आरोप केला जात होता. या पार्श्वभूमीवर भिडे यांनी हा खुलासा केला.

कन्स्ट्रक्शन यार्ड, कास्टींग यार्डसह जोगेश्वरी लिंक रोडलगतची तीन हेक्टर जागा सरकारनं हस्तांतरीत केल्याचा दावा एमएमआरसीनं केलाय. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नियमांचं पालन करतच मेट्रो-3 चे काम 100 मीटरच्या बाहेरच करण्यात येतंय. तर हरित लवादानं मेट्रो-3 च्या बांधकामावर कोणतेही निर्बँध टाकले नसल्याचंही भिडे यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या