कलात्मक मेट्रो सफर

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

मुंबईतील मेट्रो प्रत्येकालाच सुखद आणि आनंदी असा प्रवास देते..मात्र हा प्रवास आणखी सुखद आनंदी व्हावा म्हणून मेट्रो वन प्रा.लि. वतीने माझी मेट्रो प्रकल्प राबवलाय..गेल्या वर्षी या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. लोकलची गर्दी नाही, धक्काबुकी नाही, त्यातही गारेगार आणि सुकर प्रवास. मात्र आजचा मेट्रोचा प्रवास काही वेगळा आणि अविस्मरणीय होता..माझी मेट्रो प्रकल्पामुळे वर्सोवा मेट्रो स्थानकातून सुटलेली मेट्रो नेहमीच्या पेक्षा वेगळी होती.रंगीबेरंगी रंगाने आणि सुरेख चित्रांनी रंगलेली अशी ही मेट्रो होती. रंग आणि चित्रांचा मिलाफ मेट्रो गाडीवर होताच. पण मेट्रो गाडी आतूनही कलात्मक झाली होती. मेट्रोच्या आतही सुंदर चित्रे, छायाचित्र आणि कविता पाहायचा, वाचायला मिळत होत्या. अशा या कलात्मक मेट्रोतून प्रवास करताना प्रवाशांच्या चेह-यावर काही वेगळाच आनंद होता. उपक्रमानुसार चित्रकला, छायाचित्र आणि कवितांच्या स्पर्धा या उपक्रमाद्वारे घेण्यात आल्या. या उपक्रमाला मुंबईकरांनी दीड महिन्यात भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस समारंभाबरोबरच महोत्सवाचा समारोपही पार पडला. या निमित्ताने एमएमओपीएलने एक कलात्मक मेट्रो सफर आयोजित केली होती. या सफरीअंतर्गत माझी मेट्रो महोत्सवातील चित्रे, छायाचित्र आणि कवितांचे प्रदर्शन थेट मेट्रो गाडीतच भरवण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यु.पी. एस. मदान यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण करण्यात आले.

 

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या