कुणी घर देतं का घर ?

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

मुंबई - म्हाडाच्या पुनर्वसन योजनेमुळे 84 कुटुंबियांना आपल्या घराला मुकावे लागले. मेट्रो 3 प्रकल्पासाठी पिंपळवाडीतील श्रीपत टाॅवरमधील घरे दिल्याने त्यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे घर देणार असं सागून म्हाडा अधिकाऱ्यांनी 84 कुटुंबियांना बेघर केले असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. दोन महिने झाले तरी म्हाडाकडून दुसरीकडे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. हक्काचा निवारा तर गेलाच पण मास्टरलिस्टमध्ये घरे कागदोपत्री मिळाल्याने संक्रमण शिबिराचा ताबाही लवकरच या कुटुंबियांना सोडावा लागणार आहे. कुणाच्या आदेशाने कायद्याचे उल्लंघन करत घरे मेट्रोसाठी देण्यात आली, याची विचारणा म्हाडाकडे या कुटुंबियांनी केली असता त्यांना शासननिर्णयाची प्रतही दाखवली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तर पिंपळवाडीएेवजी दुसरी मोठी घरे देऊ असे सांगत म्हाडाने गेल्या दोन महिन्यांपासून या संक्रमण शिबिरार्थींना लटकवून ठेवले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात लवकरच धाव घेतली जाणार आहे. मात्र त्या बरोबरीनेच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी 84 कुटुंबियांसह असोसिएशनने केली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुर्नरचना मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांनी शासन निर्णयानुसारच ही घरे दिल्याचे सांगत या कुटुंबियांना दुसरीकडे घरे देण्यात येणार असल्याचे मुंबई लाईव्हला सांगितले आहे. तर त्यांना दुसऱ्या घराचा ताबा मिळेपर्यंत संक्रमण शिबिरातून काढणार नसल्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या