MIDCचे भूखंड वाटप ऑनलाइन

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

मुंबई - एमआयडीसीचा भूखंड वाटप ऑनलाईन होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाने घेतला आहे. राज्यातील औदयोगिक वसाहतींमधील भूखंडांचे वाटप अधिक पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी ही पद्धत वापरण्यात येणार आहे. लघुउदयोगांसाठी 20 टक्के भूखंड राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे औद्योगिक मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत एकूण 2606 सामंजस्य करार ( MOU) करण्यात आले. यापैकी 2459 सामंजस्य कराराशी हे उद्योग विभागाशी थेट संबधित आहेत. यातून 8.04 लक्ष कोटी इतकी गुंतवणूक अपेक्षित आहे. तसचं 30.4 लक्ष इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यामधील 262 करार हे प्रत्यक्षात आले आहेत. यातून 21 हजार 404 तरुणांना रोजगार मिळाले आहेत, तर 3.65 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रत्यक्षात करण्यात आली असल्याचं देसाई यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या