...छप्पर फाडके

मुंबई - एमएमआरडीएनं पनवेल इथं बांधलेल्या 2 हजार 417 घरांची गिरणी कामगारांसाठीची सोडत म्हाडातर्फे शुक्रवारी वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात पार पडली. पण या वेळी गिरणी कामगारांना डबल घरांची लॉटरी लागलीय. एमएमआरडीएची भाडेतत्वावरील घरं 160 चौरस फुटांची असून कामगारांना 225 चौरस फुटांची घरं देण्याचं धोरण आहे. पण 225 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचं घर देता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारनं 160 चौरस फुटांची दोन घरं एकत्रित करत 320 चौरस फुटांचं एक घर देण्याचा निर्णय घेतला. पण घरांच्या रचनेमुळे ही दोन घरं एकत्रित करताच येत नाहीत. त्यामुळे एमएमआरडीएनं 160 चौरस फुटांची दोन घरं एका गिरणी कामगाराला देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारच शुक्रवारची सोडत फुटली आणि कामगारांना 160 चौरस फुटांच्या दोन घरांची लॉटरी लागली.

150 गिरणी कामगारांची चांगलीच कसरत

2 हजार 417 पैकी 150 कामगारांना दोन स्वतंत्र घरांची सोडत लागलीय. पण यामध्ये 150 कामगारांना एक मजल्यावर एक तर दुसऱ्या मजल्यावर दुसरे घर लागले आहे. त्यामुळे एक घर खाली आणि एक घर वर असल्यानं कामरृगारांची चांगलीच कसरत होणाराय.

पुढील बातमी
इतर बातम्या