MMRDA मेट्रो मार्गांसाठी युनिव्हर्सल तिकीट प्रणाली लागू करेल

(Representational Image)
(Representational Image)

मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (MMRDA) आगामी मेट्रो लाइन 2A आणि 7 साठी युनिव्हर्सल तिकीट प्रणाली लागू करणार आहे, पुढील वर्षाच्या सुरूवातीस ही नवीन प्रणाली कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती मिळत आहे.

अॅड गॉडफ्रे पिमेंटा, मुंबईस्थित कार्यकर्ते यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या याचिकेमुळे ही माहिती समोर आली आहे. यावर, एमएमआरडीएनं उत्तर दिलं की, ते ही तिकीट प्रणाली लागू करणार आहेत. तसंच यासोबतच MMR मधील इतर सर्व सार्वजनिक वाहतूक प्रणालींमध्ये ते लागू करण्याची आशा आहे.

असा दावा करण्यात आला आहे की, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला बँकिंग भागीदार म्हणून नियुक्त केले गेले आहे. मेट्रो मार्ग 2A दहिसर आणि डीएन नगर दरम्यान चालणार आहे. दुसऱ्या बाजूला ७वी लाईन दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वेपर्यंत चालेल. ते अनुक्रमे लिंक रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जातील.

यातून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड २० किमी लांबीच्या डायनॅमिक ट्रायल रनचे आयोजन करते. अलीकडेच त्याची चाचणी पूर्ण झाली आहे. संशोधन डिझाइन आणि मानक संस्थेकडून प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहे, असे त्याच्या उत्तरात म्हटले आहे.


हेही वाचा

ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी १८ तासांचा ब्लॉक

नवी मुंबईकर करणार मेट्रोनं ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर

पुढील बातमी
इतर बातम्या