गिलबर्ट हिल टेकडीचे संवर्धन करण्यासाठी पालिकेचा 'हा' आहे प्लॅन

इतिहासकारांनी अंधेरीच्या गिलबर्ट हिल भागाला पर्यटनस्थळ बनवण्याची शिफारस केल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका याचं संवर्धन करण्याची योजना आखत आहे. पालिकेनं आता या क्षेत्राच्या इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्याचं ठरवलं आहे. शिवाय या भागाची साफसफाई देखील सुरू केली आहे.

इतिहासकारांनी एक हेरिटेज वॉक आयोजित केला होता. या वॉकमध्ये के.एम. वॉर्ड (अंधेरी) इथल्या पालिका अधिकाऱ्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. या जागेचं ऐतिहासिक महत्त्व तसंच 61 मीटरच्या मोनोलिथिक कॉलमबद्दल कल्पना देण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं. ही भेट पालिकेच्या ‘आपला शेजारी जाणून घ्या’ उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित केली गेली होती.

इतिहासकारांनी सांगितलं की, गिलबर्ट हिल इथली टेकडी केवळ तीन ठिकाणी आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि मुंबईतल्या गिलबर्ट हिल परिसरात. या टेकडीला एतिहासिक महत्त्व आहे. ही टेकडी ब्लॅक बेसॉल्ट या दगडापासून बनली आहे.

“या ठिकाणाच्या समृद्ध इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी पालिका अधिकारी आणि राजकारण्यांना बोलवण्याची कल्पना होती. शहरात अशी अनेक ठिकाण आहेत ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. ही ठिकाणे पर्यटनस्थळांमध्ये रूपांतरित केली जाऊ शकतात. तेथील स्थानिकांना रोजगार आणि व्यवसाय देखील मिळू शकेल, ”असं इतिहासकार आणि खाकी टूर्सचे संस्थापक भारत गोथोस्कर यांनी सांगितलं.

के पश्चिम प्रभागचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त विश्वास मोते म्हणाले, "आम्ही स्थानिकांचा सहभाग घेऊन लोकसहभाग आणि देखभाल सुनिश्चित करू.”

शिवसेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही हेरिटेज वॉकमध्ये भाग घेतला. “ऐतिहासिक महत्त्व असलेली अशीच ठिकाणं ओळखण्यासाठी मी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मी प्रभाग अधिकाऱ्यांना स्वच्छतेला प्राधान्य देण्याची विनंती केली. आम्ही याची माहिती देण्यासाठी जागोजागी फलक लावू, असं प्रियंका म्हणाल्या.


पुढील बातमी
इतर बातम्या