महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरलेली मोठी घडामोड समोर आली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डकडून (Guinness World Records) मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे (Yashwantrao Chavan Expressway) वरील Missing Link प्रकल्पातील टनेलला जगातील सर्वात रुंद भूमिगत रस्ता टनेल म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
किती मोठा आहे विक्रम?
या टनेलची रुंदी तब्बल 22.33 मीटर असून, महाराष्ट्र दिनी झालेल्या अधिकृत कार्यक्रमात हा विक्रम घोषित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
काय आहे Missing Link प्रकल्प?
हा प्रकल्प खोपोली–लोणावळा दरम्यान विकसित करण्यात आला असून, मुंबई–पुणे प्रवासात सुमारे 25 मिनिटांची बचत होणार आहे. घाट विभागातील धोकादायक आणि वळणावळणाचा रस्ता टाळून अधिक सुरक्षित आणि जलद प्रवास शक्य होणार आहे.
Maharashtra State Road Development Corporation आणि Navayuga कंपनीच्या अभियंत्यांनी पश्चिम घाटातील कठीण भौगोलिक परिस्थितीत हा टनेल उभारला. आधुनिक तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणातील कामामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठे यश मानला जातो. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनाला ट्रॅफिकचा फटका
मात्र, या सोहळ्यादरम्यान मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. VIP हालचालींसाठी काही लेन बंद करण्यात आल्याने आणि लाँग वीकेंडमुळे अनेक वाहनचालक तासनतास अडकले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करत भविष्यात अशी परिस्थिती टाळण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा