मलबार हिल व्ह्यूइंग गॅलरी पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होणार

(File Image)
(File Image)

दोन वर्षांनंतर मलबार हिल येथील व्ह्यूइंग गॅलरी पुढील आठवड्यात नागरिकांसाठी पुन्हा उघडण्यासाठी सज्ज आहे, असे उप हायड्रॉलिक अभियंता राजेश ताम्हाणे यांनी सोमवारी सांगितले. दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही व्ह्यूइंग गॅलरी बंद आहे.

दक्षिण मुंबईतील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे मलबार हिल इथली व्ह्यूइंग गॅलरी. प्रमोद नवलकर व्ह्यूइंग गॅलरी म्हणूनही याला ओळखले जाते. इथून नागरिकांना चौपाटी बीच, नरिमन पॉइंट आणि क्वीन्स नेकलेसचे विहंगम दृश्य पाहता येते.

कमला नेहरू पार्कच्या शेजारी असलेल्या, डेकचे उद्घाटन ऑक्टोबर 2018 मध्ये करण्यात आले. एकावेळी 50 लोक बसू शकतील इतके मोठे आहे. यात चार मोठ्या दुर्बीणही आहेत.

“लॉकडाऊन संपल्यानंतर आणि सर्व निर्बंध शिथिल झाल्यानंतर, सर्व सार्वजनिक ठिकाणी जसे की समुद्रकिनारे आणि उद्याने पुन्हा उघडण्यात आली. तथापि, हँगिंग गार्डन, कमला नेहरू पार्कला भेट देणार्‍या पर्यटकांना अजूनही व्ह्यूइंग गॅलरी पाहता येत नाही,” असे माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिले होते.

“साथीच्या रोगाच्या काळात नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याने व्ह्यूइंग गॅलरी बंद करण्यात आली. ही जागा पालिकेच्या हायड्रोलिक विभागाकडे आहे,” प्रशांत गायकवाड, डी-वॉर्ड (मलबार हिल, नेपियन सी रोड) सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणाले.


हेही वाचा

पूर्व द्रुतगती महामार्गाचा 'हा' भाग 12 दिवस बंद

म्हाडाची जूनमध्ये 1200 घरांची लॉटरी

पुढील बातमी
इतर बातम्या