मेट्रो मार्गावरून आता थेट मुंबई विमानतळावर जाता येणार

'कुलाबा वांद्रे- सीप्झ - आरे भुयारी मेट्रो' मार्गिकेतील टर्मिनल 2 मेट्रो स्थानकावरून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर पोहचणे अखेर आता सोपे झाले आहे. टर्मिनल 2 मेट्रो स्थानक ते विमानतळ टर्मिनल 2 दरम्यान बांधलेला 88 मीटर लांबीचा पादचारी पूल अखेर गुरुवारपासून सेवेत दाखल झाला.

(एमएमआरसी) टर्मिनल 2 मेट्रो स्थानक ते विमानतळादरम्यान (पी4 एंट्री) विशेष बस सेवा सुरू केली आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने टर्मिनल 2 मेट्रो स्थानक थेट विमानतळाशी जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचे निर्देश 'एमएमआरडीए'ला दिले. त्यानुसार 'एमएमआरडीए'ने 88 मीटर लांब, 4.3 मीटर रुंद आणि 3 मीटर उंच पादचारी पूल बांधला. स्ट्रक्चरल स्टीलचा वापर करून हा पूल बांधण्यात आला आहे.

पादचारी पूल सेवेत दाखल झाल्याने भुयारी मेट्रो स्थानकावरून थेट विमानतळावर अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहचणे शक्य झाले आहे.

टर्मिनल 2 मेट्रो स्थानकाद्वारे भुयारी मेट्रो 3 मार्गिका विमानतळाशी जोडण्यात आली आहे. मात्र, त्यात प्रवाशांना होणारी अडचण लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पदाचारी पूल उभारला असून तो सेवेत दाखल झाला आहे. या सेवेमुळे आता ट्रॅफिकमध्ये अडकण्याचं टेन्शन संपलं असून विमानतळावर पोहोचणं अधिक सोयीस्कर होणार आहे.

प्रवासी आता टर्मिनल 2 मेट्रो स्थानकावरून विमानतळाच्या टर्मिनल 2 (P4 एंट्री) वर अवघ्या काही मिनिटांत पोहोचू शकतील. यापूर्वी 450 मीटर अंतर पायी चालत जाण्यासाठी सुमारे 30 मिनिटे लागत होती, ज्यामुळे सामानासह प्रवास करणे अडचणीचे होते. आता ही अडचण दूर झाली आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळून प्रवास अधिक सोयीस्कर आणि तणावमुक्त होईल.


पुढील बातमी
इतर बातम्या