रिलायन्स वीज बिलावरील गुजराती भाषेचा पर्याय बंद होणार?

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

मुंबई - सोशल मीडियावर सध्या रिलायन्स एनर्जी कंपनीचं वीज बिल व्हायरल झालं आहे. ‘मुंबई इलेक्ट्रिसिटी बिल इन गुजरात’ ही तर सुरुवात आहे, या कॅप्शनखाली एक गुजराती भाषेतील वीज बिल व्हायरल होत आहे. पण या व्हायरल बिलामागचं सत्य ‘मुंबई लाइव्ह’नं तपासलं आहे.

रिलायन्स एनर्जी कंपनीच्या वेबसाईटवर वीज बिल भरण्यासाठी भाषा निवडीचा पर्याय देण्यात आला आहे. वेबसाईटवर मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती अशा चार भाषांचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे आपण निवडलेल्या पर्यायावरून आपल्याला त्या भाषेमध्ये बिल येतं. आपण मराठी भाषा निवडली तर आपल्याला मराठी भाषेत बिल देण्यात येते.

हे बिल व्हायरल झाल्यानंतर, मनसेने रिलायन्स एनर्जी दहिसर हेड ऑफिसमध्ये पत्र दिले. गुजराती ऑप्शनल भाषा काढून टाका असे या निवेदनात नमूद केले आहे. पुढील 15 दिवसांत त्याची अमलबजावणी होईल, असं आश्वासनही रिलायन्सकडून देण्यात आल्याचा दावा मनसेने केला आहे. मात्र रिलायन्सकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका अजूनही स्पष्ट करण्यात आलेली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या