गिरणी कामगारांच्या घर घोटाळ्याची चौकशी होणार

मुंबई - गिरणी कामगारांच्या घरांच्या दलालीचा ‘मुंबई लाईव्ह’नं गेल्या आठवड्यात पर्दाफाश केला होता. याप्रकरणी म्हाडाच्या मुंबई मंडळानं खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. त्यानुसार लवकरच गुन्हाही दाखल होणाराय. मात्र या प्रकरणाची विभागीय किंवा दक्षता विभागाकडूनही चौकशी होण्याची मागणी गिरणी कामगार नेते आणि संघटनांकडून होत होती. त्यानुसार मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी या प्रकरणाची दक्षता विभागामार्फतही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी ‘मुंबई लाईव्ह’ला दिली.

दलालांनी ज्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आहे त्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला होता. यावर पोलीस यासंबंधाची चौकशी करणार आहेतच, पण म्हाडाही आपल्यापरीनं चौकशी करेल आणि दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल, असं आश्वासन लाखे यांनी दिलं.

पुढील बातमी
इतर बातम्या