मेट्रोच्या निधीचा प्रश्न मिटणार

मुंबई - मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पांसाठी राज्य सरकारने कर्जासाठी गॅरेंटर राहण्यास काही दिवसांपूर्वी नकार दिला होता. यावरून राज्य सरकारवर मोठी टीका झाल्यानंतर मात्र सरकार जागे झाले असून, आता या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी हमी अर्थात गॅरेंटर राहण्यास सरकारने होकार दिला आहे. या संबंधीचे पत्र लवकरच एमएमआरडीएला प्राप्त होईल अशी माहिती एमएमआरडीएचे सह प्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली आहे.

मेट्रोसाठी लागणाऱ्या निधीतील काही निधी कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हमी, गॅरेंटर राहणे गरजेचे आहे. मात्र राज्य सरकारने हमी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे हे दोन्ही मेट्रो मार्ग कसे मार्गी लावायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सरकराने आता सकारात्मक भूमिका घेत हमी देण्याचा निर्णय घेतल्याने आता या प्रकल्पातील आर्थिक अडचणी दूर झाल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या