मुंबईकरांचा गारेगार प्रवास लांबणीवर

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

मुंबई - मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी एप्रिल महिन्यात कुर्ला कारशेडमध्ये दाखल झालेली एसी लोकल सेवेत येण्यासाठी पुढील वर्ष उजाडणार आहे. या लोकलच्या चाचणीला दिवाळीपर्यंत सुरुवात होईल. एसी लोकलच्या जवळपास 30 पेक्षा जास्त चाचण्या होणार आहेत. रेल्वेमार्ग आणि कारशेडमध्ये या चाचण्या घेण्यात येतील. एसी लोकलच्या सर्व चाचण्यांना जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या चाचण्या कल्याण-कर्जत आणि कसारा-कुर्ला मार्गावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा गारेगार प्रवास लांबणीवर पडला आहे. भारतात बनवलेल्या या एसी लोकलसाठी जवळपास 54 कोटी रुपयांचा खर्च आलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या