विधानभवन स्थानकाचं ७५.४ टक्के बांधकाम पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. भूयारी मार्गाचं काम वेगाने सुरु असून, बुधवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे विधानभवन मेट्रो स्थानकाच्या साच्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. स्थानकावरून रोज ७५ हजारपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करणार आहेत.

विधानभवन स्थानकाचा विचार करता ७५.४ टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे. पॅकेज १ अंतर्गत हुतात्मा चौक, चर्चगेट आणि कफ परेड स्थानकांची कामं वेगात सुरू आहेत. हे पूर्ण झालेलं बांधकाम पॅकेज १च्या अंतर्गत आहे. यात तळाचा स्लॅब, मॅझेनाईन स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब आणि छताचा स्लॅब या कामांचा समावेश आहे. विधानभवन स्थानकाचे बांधकाम कट आणि कव्हर या आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे.

या स्थानकात प्रवाशांसाठी ७ प्रवेश-निकसद्वारांची सुविधा आहे. दरम्यान, एमआयडीसी मेट्रो स्थानकाचं अशा प्रकारच काम पूर्ण करण्यात आलं आहे. विधानभवन स्थानकाद्वारे मंत्रालय, विधानभवन, नवीन प्रशासकीय इमारत जोडले जाणार आहेत.


हेही वाचा -

आरेतील ६०० एकर जागा वनांसाठी राखीव, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक सुरूच, पबजीसह ११८ अॅप्स बॅन


पुढील बातमी
इतर बातम्या