चौदा वर्षांचा वनवास संपला...

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

परळ - परळमध्ये मोक्याच्या ठिकाणी उभ्या अससेल्या या टॉवरच्या जागी आधी गिरणी कामगारांची घरं होती. ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी मालकांनी जबरदस्तीनं कामगारांना 2003 मध्ये हूसकावून लावलं. डोक्यावरचं छप्परही गेलं आणि नोकरीही.. पण, यातील अरूण कांबळे नावाच्या कामगारानं हार मानली नाही. मालकाविरोधात, एनटीसी (नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन लिमिटेड) विरोधात उभं राहतं लढा सुरू केला. तब्बल चौदा वर्षांच्या लढ्यानंतर अखेर या कामगाराला यश मिळालं. गिरणी चाळीच्या कायद्यानुसार 2001 पासून चाळीतील घरांची मालकी कायमस्वरूपी कामगारांना मिळाली. असं असताना मालकानं कामगारांना हूसकावून लावलं. याची गंभीर दखल घेत देखरेख समितीने अखेर कांबळेंना न्याय दिला आणि गेल्या आठवड्यात त्यांना सिताराम मिल कंपाऊंडमधील घराचा ताबा दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या