प्रभादेवीत वाळूवर रंगणार कबड्डीचा थरार

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • कबड्डी

प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईत पहिल्यांदाच बीच कबड्डीचा थरार मुंबईकरांना अनुभवता येणार अाहे. २५ ते ३० एप्रिलदरम्यान प्रभादेवी चौपाटी, वाडिया बंगला समुद्रकिनारी बीच कबड्डी स्पर्धा रंगणार अाहे.

२० संघांचा समावेश

ही स्पर्धा बीच कबड्डी नियमांच्या आधारे खेळविली जाणार असून मुंबईतल्या २० संघ या स्पर्धेत सहभागी होणार अाहेत. त्यात अमरहिंद, गोल्फादेवी, जागृती, जयदत्त, चंद्रोदय, विजय क्लब, विकास, दुर्गामाता, सिद्धीप्रभा, अमरसंदेश, गुड मॉर्निंग, साईनाथ ट्रस्ट असे दिग्गज संघ या स्पर्धेत खेळणार अाहेत.

तर राज्यस्तरीय स्पर्धा घेऊ...

२३ व्या वर्षात पदार्पण करताना मंडळाने या वर्षी ३ राज्यस्तरीय स्पर्धा, १ व्यावसायिक, १ स्थानिक पुरुष व १ ज्युनियर मुलांची स्पर्धा घेतली होती. बीच कबड्डी स्पर्धेच्या अायोजनात यशस्वी ठरलो तर २५व्या वर्षी अाम्ही बीच कबड्डी स्पर्धेचे अायोजन करून, असा मानस अोम ज्ञानदीप मंडळाने व्यक्त केला अाहे.


हेही वाचा -

राष्ट्रीय बीच कबड्डीसाठी उपनगरच्या कोमल देवकरकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

पुढील बातमी
इतर बातम्या