राष्ट्रीय बीच कबड्डीसाठी उपनगरच्या कोमल देवकरकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • कबड्डी

अांध्र प्रदेश इथल्या गुटूर जिल्ह्यात होणाऱ्या १० व्या पुरुष अाणि महिलांच्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्टर संघांची घोषणा करण्यात अाली. मुंबई उपनगरच्या कोमल देवकर हिच्याकडे महाराष्ट्राच्या महिला संघाचं नेतृत्व सोपवण्यात अालं अाहे. नंदूरबारच्या दादासो अावाडची पुरुष संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात अाली अाहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ अलिबागच्या बीचवर कसून सराव करत अाहेत.

नुकताच मिळाला शिवछत्रपती पुरस्कार

कोमलनं राष्ट्रीय स्पर्धेपासून अातापर्यंत महाराष्ट्र संघातलं अापलं स्थान कायम राखलं अाहे. नुकताच कोमल देवकर हिला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात अालं होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे कर्णधारपदी कोमल देवकर हिचं पारडं जड मानलं जात होतं. मुंबई शहरच्या एकाही खेळाडूला महिला संघात स्थान मिळवता अाला नाही. रत्नागिरीच्या श्रद्धा पवार हिला पुन्हा एकदा बीच कबड्डीसाठी संधी देण्यात अाली अाहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ २३ फेब्रुवारी रोजी विजयवाडा एक्स्प्रेसने स्पर्धेकरिता अांध्र प्रदेशला रवाना होती.

महाराष्ट्राचे संघ पुढीलप्रमाणे -

महिला - कोमल देवकर (कर्णधार, मुंबई उपनगर), माधुरी गवंडी (ठाणे), अंकिता जगताप (पुणे), श्रद्धा पवार (रत्नागिरी), राणी उपहार (मुंबई उपनगर), मोनाली घोंगे (रायगड)

पुरुष - दादासो अाव्हा (कर्णधार, नंदूरबार), अोमकार जाधव (मुंबई शहर), बिपीन थळे (रायगड), निशिकांत पाटील (ठाणे), अाशिष मोहिते (मुंबई उपनगर), प्रमोद घुले (पुणे).

पुढील बातमी
इतर बातम्या