पिंपळेश्वर क्रीडा मंडळाची कबड्डी स्पर्धेत बाजी

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कुमार गट निवड चाचणीत पिंपळेश्वर क्रीडा मंडळाने अंतिम फेरीत बाजी मारत जेतेपदाला गवासणी घातली. हा सामना वडाळ्यातील शारीरिक शिक्षण क्रीडा संकुल येथे खेळवण्यात आला. 

अटीतटीच्या लढतीत पिंपळेश्वर विजयी

यावेळी करीरोडच्या पिंपळेश्वर क्रीडा मंडळ विरुद्ध सिद्धी प्रभा फाऊंडेशन प्रभादेवी यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीती पिंपळेश्वर क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत 27-17 अशा मोठ्या फरकाने सिद्धी प्रभा संघाचा पराभव केला.

112 संघानी घेतला होता सहभाग

या अंतिम सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन झाले. पण पहिल्या सत्रात 10-9 अशी आघाडी मिळवत पिंपळेश्वर संघाने सामन्यात आपला दबदबा कायम राखला. पिंपळेश्वरच्या ऋषिकेश काणेरकर याची चौफेर लढाई, तर अनमोल सावंत आणि सोहम बेलोसे या दोघांच्या उत्कृष्ट पकडीने संघाला विजय मिळवण्यात यश आले. या स्पर्धेत एकूण 112 संघानी सहभाग घेतला होता. यावेळी चषक देऊन विजेत्या संघाचा सत्कार करण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या