व्रूssम व्रूssम फियाट!

मुंबई - काही दशकांपूर्वी मुंबईत काळी-पिवळी फियाट म्हणजेच प्रिमिअर पद्मिनी टॅक्सीचं राज्य होतं. 2000 सालानंतर हळूहळू 'फियाट'चं मुंबईकरांशी असलेलं नातं कमी होऊ लागलं. काही वर्षानंतर तर अशा गाड्या गायबच झाल्या. पण, आज ही अशा काही संस्था आणि माणसं आहेत ज्यांचं 'फियाट'वर खूप प्रेम आहे. रॉनी वेसुना यांच्याकडे आजही 'फियाट' कार आहे. तिची जपणूक व्हावी आणि वर्षानुवर्षे तिचं संगोपन व्हावं म्हणून तिला आता ते आठवण म्हणून 'मुंबई फियाट क्लासिक कार क्लब'ला देणार आहेत. या क्लबमध्ये एकूण 125 जुन्या कारचं कलेक्शन आहे. त्यात आता 'फियाट'चा देखील समावेश होणार आहे. 2007 पासून अशा अनेक प्रेेमींनी आपल्या आठवणीतल्या कार या क्लबमध्ये दाखल केल्या आहेत. या क्लबमध्ये एकूण 65 सभासद आहेत. मुंबईसह पुणे, दिल्ली, बंगळुरु अशा शहरात देखील या क्लबच्या शाखा आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या