तुम्ही ही खा डेझर्टमधला गोळा

वांद्रे - बर्फाचा गोळा खायला कोणाला आवडत नाही. पण, आजारापोटी आपण अनेकदा थंड पेय खाणं किंवा पिणं टाळतो. याचं गोष्टीला लक्षात घेऊन वांद्रे परिसरातील 'स्नो हाऊस' आपल्याला पौष्टीक, चवीदार गोळा डेझर्ट्सच्या रुपात उपलब्ध करुन देतं.

स्नो हाऊसच्या मालक 'लिट्टी एंथोनी' यांनी सांगितलं की, कोरियन पद्धतीत हा गोळा बनवला जातो. बर्फाच्या गोळ्यात फळांचं मिश्रण घातलं जातं, ज्यामुळे हा गोळा खूप स्वादिष्ट आणि पौष्टीक असतो. फळांच्या मिश्रणात दूध,मलई,साखर हे साहित्य वापरलं जातं. एवढंच नाही तर या फळांमध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी, जांभूळ, संत्र अशा फळांची चव चाखता येते.

लिट्टी यांच्या सांगण्यानुसार डेझर्टमध्ये ग्राहक हंगामी फळांना जास्त पसंती देतात. तसंच रेड बिन्स असलेले फ्लेव्हर्स ग्राहकांना जास्त आवडतात. तर, लहान मुलं ओरियो असलेले फ्लेव्हर्स जास्त पसंद करतात. या पदार्थांना आपण जास्त दिवस नाही टिकवू शकत. या डेझर्ट्सना तयार केलं की 20 मिनिटांतच हे खाणं जरुरी आहे नाहीतर ते खराब होऊ शकतात. 120 रुपयांपासून ते 175 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचा गोळा डेझर्ट्सच्या रुपात आपण इथे खाऊ शकतो.

 

पुढील बातमी
इतर बातम्या