भाऊबीजेचं महत्त्व

मुंबई - कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. याला यम द्वितीया असंही म्हणतात. भाऊबीजेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला कुंकू अक्षतनं टिळा लावते आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याची कामना करते. अशी अख्यायिका आहे की, यम देवतेने याच दिवशी बहीण यमीला दर्शन दिले होते, जी खूप दिवसांपासून भावाच्या भेटीसाठी व्याकूळ होती. आपल्या घरी भाऊ यम आल्याचं पाहून बहीण यमीनं प्रफुल्लित मनानं भावाचं  आदरातिथ्य केलं. तेव्हा यमनेही प्रसन्न होऊन तिला वरदान दिले. भाऊबीज हा सण भावाच्या प्रती बहीणीची असलेली माया व्यक्त करते. दिवाळीच्या दिव्याबद्दल एक खास गोष्ट अशीही आहे, की दिवा अंधारावर मात करतो. तसंच दिवाळीचा दिवा हा आपल्या आंतरिक उर्जेचा प्रतिक आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या